कोविडःआरटीपीसीआरमध्ये १४ पॉझिटिव्ह,५३ डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन तीन पॉझिटीव्ह

अकोला दि.२(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २७९ अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दिवसभरात ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५१११(४९२४+१५०२+९५) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. १ व खाजगी शून्य) १ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह १.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३६७४३४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६३३१९ फेरतपासणीचे ४१० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७० नमुने होते. आजपर्यंत एकूण ३६७४३४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१८३१०आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर १ पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात १४  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नऊ पुरुष, पाच स्त्री रुग्ण आहेत. त्यातील सात अकोला शहरातील, तीन मुर्तिजापूर, तीन तेल्हारा व एक बार्शी टाकळी येथील रहिवासी आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

५३ जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१२३ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५१११(४९२४+१५०२+९५) आहे. त्यात ११६४ मृत झाले आहेत. तर ६३८२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १२३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १२८ चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२१) दिवसभरात १२८  चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण मध्ये दोन, अकोट येथे पाच, बार्शी टाकळी येथे पाच, मुर्तिजापूर येथे सात, अकोला महानगरपालिका क्षेत्रात ०,आरोग्य कर्मचारी एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४५, हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या. त्यात बार्शी टाकळी येथे दोन तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.असे एकूण १२८ चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ