'शिवरायांची जयंती आली...’ गिताचे विमोचन

 


अकोला, दि.१९(जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात  विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ, अकोला यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘माझ्या राजाची जयंती आली, शिवरायांची जयंती आली’, या गिताचे शानदार विमोचन करण्यात आले.

जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. सुचित्रा पाटकर या अध्यक्षस्थानी होत्या. तर  उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, प्राचार्य डॉ. राधेश्याम सिकची, प्रा. डॉ. सुहास उगले,  गजानन नारे, अनंत खेळकर, किशोर बळी , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, दिग्दर्शक व गितकार- संगितकार मुकुंदकुमार नितोने, अधीक्षक मिरा पागोरे, गजानन महल्ले तसेच अन्य कलावंत, नृत्य दिग्दर्शक, कलारसिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गिताच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. हे  तसेच गिताचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी गायक तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गायिका निता खडसे, संकलक विश्वास साठे, नृत्य दिग्दर्शक रहिम शेख, मोहसीन शेख व त्यांचे सहकारी तसेच सर्व कलावंत तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खडसे यांनी केले व गिताच्या निर्मिती मागील भावना सांगितल्या. दिग्दर्शक मुकुंद नितोने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती यांनी केले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ