कोविडःआरटीपीसीआरमध्ये ११७ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, ४०० डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन पाच पॉझिटीव्ह

अकोला दि.(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ४८४ अहवाल प्राप्त झाले. त्यात ११४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून  तीन असे एकूण  ११७  जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ४०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दोघांच्या  मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.१) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६४३४५(४८६०१+१४९१२+८३२) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. ११४ व खाजगी ३) ११७ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी  = एकूण पॉझिटीव्ह १२२.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३६२१३२ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५८०४५ फेरतपासणीचे ४१० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३६७७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३६२१३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३१३५३१ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर ११७ पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात ११४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ६९ पुरुष,४३ स्त्री रुग्ण आहेत.  त्यातील ६१ जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील तीन, पातूर येथील दहा, मुर्तिजापूर येथील १६, बार्शीटाकळी येथील आठ, बाळापूर येथील चार,तेल्हारा येथील १० रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात तीन  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

४०० जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.  त्यात अकोला येथील एक ३० वर्षीय पुरुष रुग्ण  असून या रुग्णास दि.१ रोजी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक ५५ वर्षीय महिला हतरुण बाळापूर येथील रहिवासी असून या महिलेस दि.२२ जानेवारी रोजी दाखल केले होते. उपचारा दरम्यान आज  मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१०९९ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६४३४५(४८६०१+१४९१२+८३२) आहे. त्यात ११५९ मृत झाले आहेत. तर ६२०८७जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १०९९ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः ३८६ चाचण्यात पाच पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१) दिवसभरात झालेल्या ३८६ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे एक, बाळापूर येथे एक,  अकोला महानगरपालिका क्षेत्रात ३४५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३, जिल्हा आरोग्य कर्मचारी सात चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोट येथे आठ चाचण्यात दोन, मुर्तिजापूर येथे चार चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे सात चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण ३८६ चाचण्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना