कोविडःआरटीपीसीआरमध्ये 112 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू, 123 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 10 पॉझिटीव्ह

 

अकोला दि.3(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 424 अहवाल प्राप्त झाले. त्यात 94 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 18 असे एकूण 112 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर तिघांच्या  मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64467(48695+14922+850) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 94  व खाजगी 18) 112 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 10 = एकूण पॉझिटीव्ह 122.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 362556  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 358467 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3679 नमुने होते. आजपर्यंत एकूण 362556 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 313861 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 112  पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 94  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 55 पुरुष, 39 स्त्री रुग्ण आहेत.  त्यातील 33 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील एक, पातूर येथील सहा, मुर्तिजापूर येथील 27, बार्शीटाकळी येथील चार, बाळापूर येथील दोन, तेल्हारा येथील दोन, अकोट येथील 19 रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 18  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

123 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात अकोट येथील 83 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 24 जानेवारी रोजी दाखल केले होते, दीपक चौक, अकोला येथील 70 वर्षीय महिला असून या महिला रुग्णास दि. 1 फेब्रुवारी रोजी दाखल केले होते तर अकोट येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 31 जानेवारी रोजी दाखल केले होते.  या तिघांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1095 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64467(48695+14922+850) आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 62210 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1095 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 442 चाचण्यात 10 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.2) दिवसभरात झालेल्या 442 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे सहा, अकोट येथे 19, बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे चार,  अकोला महानगरपालिका क्षेत्रात 345, जिल्हा आरोग्य कर्मचारी तीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर पातूर येथे पाच चाचण्यात एक, तेल्हारा येथे तीन चाचण्यात एक, मुर्तिजापूर येथे चार चाचण्यात एक,  हेडगेवार लॅब येथे 14 चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 442 चाचण्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना