कोविडःआरटीपीसीआरमध्ये पाच पॉझिटिव्ह, 19 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन दोन पॉझिटीव्ह
अकोला दि.24(जिमाका)- आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना
संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 161 अहवाल प्राप्त झाले. त्यात
चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच खाजगी लॅब मधून एक असे एकूण पाच जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दिवसभरात 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल
(दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या
65123(49132+15031+960) झाली
आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 4 व खाजगी 1) 05 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 02= एकूण
पॉझिटीव्ह 07.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 367775 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 363660 फेरतपासणीचे 410 तर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 367775
अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 318643
आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आरटीपीसीआर
पाच पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार पुरुष रुग्ण
आहेत. त्यातील तीन अकोला शहरातील तर अकोट येथील एक रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
19 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम
आयसोलेशन येथून 19 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
106 जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण
संख्या 65123(49132+15031+960) आहे. त्यात 1164 मृत
झाले आहेत. तर 63853 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत 106 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 199
चाचण्यात दोन पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.23) दिवसभरात 199 चाचण्या
झाल्या त्यात दोन अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला ग्रामीण, अकोट व बाळापूर येथे प्रत्येकी एक, मुर्तिजापूर
येथे दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 151 चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 40 चाचण्यात एक व हेगडेवार
लॅब येथे तीन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 199 चाचण्यात
दोन अहवाल पॉझिटीव्ह आला, असे
जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा