कोविडःआरटीपीसीआरमध्ये 41 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 96 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 11 पॉझिटीव्ह

 

अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 306 अहवाल प्राप्त झाले. त्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 15 असे एकूण 41 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तर एकाचा मृत्यूची नोंद झाली,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64876(48985+14972+919) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 26 व खाजगी 15) 41 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 11 = एकूण पॉझिटीव्ह 52.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 365123 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 361015 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3698 नमुने होते. आजपर्यंत एकूण 365123 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 316138 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 41 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 26  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 18 पुरुष, आठ स्त्री रुग्ण आहेत. त्यातील नऊ जण हे अकोला शहरातील, अकोट येथील 12, मुर्तिजापूर येथील दोन, तेल्हारा येथील दोन, बार्शीटाकळी येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

96 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण पिंपळखुटा ता.पातूर येथील 30 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

308 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64876(48985+14972+919) आहे. त्यात 1163 मृत झाले आहेत. तर 63405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 308 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 204 चाचण्यात 11 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 204 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 36 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोला येथे चार चाचण्यात दोन, तेल्हारा येथे सात चाचण्यात तीन, मुर्तिजापूर येथे सात चाचण्यात एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 143 चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे सात चाचण्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 204 चाचण्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ