पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

अकोला,दि. 24(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 25 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 8 वा. 50 मि.नी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तिजापूर येथे आगमन. सकाळी नऊ वाजता रेशनकार्ड वितरण संदर्भात प्राप्त तक्रारी व रेशनकार्ड वाटप शिबीर कार्यक्रमाची आढावा सभा.  सकाळी 10 वाजता खाजगी पतपुरवठा संस्था- फायनान्स कंपनी व सावकारी कर्ज वाटप व वसुली संदर्भात   आढावा. स्थळः- उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तिजापूर. सकाळी साडेदहा वाजता मौजे जांभा बु. ता. ‍मुर्तिजापूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मौजे जांभा बु. ता.मुर्तिजापूर येथे आगमन व कर्तव्य यात्रेनिमित्त आयोजित शिबिरातील विविध शासकीय विभागाचे स्टॉलला भेट. दुपारी 12 वाजता मौजे जांभा बु. ता. ‍मुर्तिजापूर येथे लंघापुर पुनर्वसित गावांतील नागरिकांना भुखंड ताबा पावती वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सवडीने दर्यापुरमार्गे अमरावतीकडे प्रयाण.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ