अंगणवाडी, मदतनीस पदभरती; अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन
अकोला, दि.1(जिमाका)- एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रामीण 1 व 2 या प्रकल्प
अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरीता भरती
प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन
निर्णयानुसार होणार आहे. पदभरतीकरीता कोणीही व कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये तसेच
कुठल्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला
ग्रामीण 1 व 2 चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा