कोविडःआरटीपीसीआरमध्ये 72 पॉझिटिव्ह, 192 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह
अकोला दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)
370 अहवाल प्राप्त झाले. त्यात 61 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी
लॅब मधून 11 असे एकूण 72 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 192 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यामुळे
आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64645(48833+14939+873) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 61 व खाजगी 11) 72 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी
सात = एकूण पॉझिटीव्ह 79.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 363341
नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 359247 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3684 नमुने होते. आजपर्यंत एकूण 363341 अहवाल प्राप्त झाले आहेत.
एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 363341 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 72 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआरचाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 61 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात 36 पुरुष, 25 स्त्री रुग्ण आहेत. त्यातील 27 जण
हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील
पाच, पातूर येथील पाच, मुर्तिजापूर येथील 17, बाळापूर
येथील चार, अकोट येथील तीन रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या
अहवालात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
192 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
786 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64645(48833+14939+873)
आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 62697 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत 786 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 184 चाचण्यात सात पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 184 चाचण्या झाल्या
त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे दोन, पातूर येथे पाच, अकोला महानगरपालिका
क्षेत्रात 120, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 32 चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोला
येथे चार चाचण्यात एक, बाळापूर येथे एका चाचण्यात एक, मुर्तिजापूर
येथे चार चाचण्यात एक, जिल्हा आरोग्य कर्मचारी येथे आठ चाचण्यात दोन, हेडगेवार
लॅब येथे आठ चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 184 चाचण्यात सात जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा