अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांना अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला, दि.11(जिमाका)- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता पात्र शाळा व संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 7 ऑक्टोंबर 2015 नुसार जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आयटीआय व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील शाळा व संस्थांनी 18 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सार करण्यात येवू नये यांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ