शिवजयंती; मद्यविक्री बंद

 

अकोला, दि.18 (जिमाका)- जिल्ह्यात शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात मिरवणुकी काढण्यात येतात. याकालावधीत कायद्या व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दारुबंदी कायदा 1949 मधील 142(1) नुसार शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम