कोविडःआरटीपीसीआरमध्ये 157 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 300 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन नऊ पॉझिटीव्ह
अकोला दि.1(जिमाका)- आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 510 अहवाल प्राप्त झाले. त्यात 145 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 12 असे एकूण 157 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 300 जणांना डिस्चार्ज देण्यात आले,
तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.31)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64223(48487+14907+829) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 145 व खाजगी 12) 157 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 9 = एकूण पॉझिटीव्ह 166.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 361648 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 361236 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे
3670 नमुने होते. आजपर्यंत एकूण 361648 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 313161 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 157 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 145 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 59 महिला व 86 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 39 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील सात,
पातूर येथील आठ, मुर्तिजापूर येथील 43, बार्शीटाकळी येथील 17,
बाळापूर येथील सात, अकोट येथील 11 व तेल्हारा येथील 13 रहिवासी आहे.
खाजगी लॅबच्या अहवालात 12 अहवाल पॉझिटीव्ह आला असे
एकूण 157 जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
झाली.
300 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 300 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज एकाच्या मृत्यूची नोंद झाली. हा
रुग्ण कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील 71 वर्षीय महिला असून या
रुग्णास दि. 29 जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
1379
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64223(48487+14907+829) आहे. त्यात 1157 मृत झाले आहेत. तर 61687 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत
1379 जणांवर उपचार
सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 394 चाचण्यात नऊ पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.31) दिवसभरात झालेल्या 394 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे दोन, अकोट येथे 22, बाळापूर येथे दोन, बार्शीटाकळी येथे तीन, पातूर येथे चार, तेल्हारा येथे पाच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 25 चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर मुर्तिजापूर येथे चार चाचण्यात दोन, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 299 चाचण्यात दोन, जिल्हा आरोग्य
कर्मचारी 13 चाचण्यात दोन, हेडगेवार लॅब येथे 15 चाचण्यात तीन
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 394 चाचण्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा
रुग्णालयाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा