वैयक्तिक व समूह लाभाच्या योजना; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अर्ज मागविले

                  अकोला,दि. 25(जिमाका)-  केंद्रवर्ती अर्थसंकल्प  योजनेअंतर्गत सन 2021-22 वर्षाच्या गट निहाय प्रारुप आराखडा अतिरिक्त प्रारुप आराखड्यातील वैयक्तिक सामूहिक लाभाच्या योजनांचे अर्ज दि.  10 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला येथे सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले.

वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या 85 टक्के अनुदानावर तुषार संच, काटेरी तार, खाद्य स्टॉल, शेळी गट, काटेरी तार लोखंडी एंगलसह, दालमिल, मोहफुल संकलनासाठी जाळी, ठिबक सिंचन, किराणा दुकान इ. सामूहिक व प्रशिक्षण योजना  गट ब अंतर्गत एमएस-सीआयटी, मराठी-30 टंकलेखन, इंग्रजी-30 टंकलेखन, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेचे 45 दिवसाचे प्रशिक्षण, हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, नळ फिटींग व पाईप लाईन फिटींग प्रशिक्षण, एल.ई.डी. बल्ब, बॅटरी तयार करण्याचे प्रशिक्षण, कृषी माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण, मोबाईल रिपेरींगचे प्रशिक्षण, फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण, अकाऊंट असिस्टंट युसींग टॅली प्रशिक्षण, वस्तु व सेवा कर (GST) अकाऊंट असिस्टंटचे प्रशिक्षण, पर्यटन गाईडचे प्रशिक्षण, बँकींग अँड फायनान्स सर्व्हिसेस (सर्टीफिकेट कोर्स) चे प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक पद्धतीने भाजीपाला/हळद लागवडीचे प्रशिक्षण देऊन माती परीक्षण, पानाचा नमुना तपासणी, भाजीपाला रोपे व खते वाटप करुन वेळोवेळी निरीक्षण करणे, गट क अंतर्गत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर, फोम मालापासुन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंना कुशन तयार करण्याचे प्रशिक्षण, युवतींना शिलाई मशीन व एब्रॉडरीचे प्रशिक्षण, पेपर प्लेट मेकींग प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगार मिळण्यासाठी डेझर्ट कुलर बनविण्याचे प्रशिक्षण, ॲल्युमिअम सेक्शन पार्टीशनचे प्रशिक्षण, मातीपासुन मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण, महिला व युवतींना कागदी पिशवी बनविण्याचे निवासी प्रशिक्षण, प्लॉस्टर ऑफ पॅरीस पासुन घराच्या छताला वेगवेगळ्या डिझाईन काढुन पी.ओ.पी.चे प्रशिक्षण, मेळघाटातुन पुनर्वसीत आदिवासी लाभार्थ्यांच्या घरात 2.5 विद्युत फिटींग कार्यान्वित करणे, सिमेंट व दगडी चुरीपासुन दरवाजे, खिडक्या बनविण्याचे प्रशिक्षण, महिलांना लेदर बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण, धुन्याचा सोडा व फिनाईल बनविण्याचे प्रशिक्षण, आदिवासी महिला बचत गटातील महिलांना बिबेपासुन गोळंबी तयार करण्याचे प्रशिक्षण, यांची यादी प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या सुचना फलकावर प्रसिद्ध केली आहे. या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडे जमातीचा दाखला, हिवासी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र योजनेच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

लाभार्थ्यांनी अर्ज केला म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळेल असे नसून शासनाकडून प्राप्त झालेल्या लक्षांक, निधी आवश्यक कागदपत्राची पूर्तता विचारात घेऊन निवड समितीव्दारे लाभार्थी निवड करण्यात येईल. तरी वरील योजनांचा पात्र   ईच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ