कोविडःआरटीपीसीआरमध्ये 42 पॉझिटिव्ह, 119 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह


अकोला दि.9(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 407 अहवाल प्राप्त झाले. त्यात 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून तीन असे एकूण 42 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64802(48946+14960+896) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 39 व खाजगी 3) 42 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी  7 = एकूण पॉझिटीव्ह 49.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 364567 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 360462 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3695 नमुने होते. आजपर्यंत एकूण 364567 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 315621 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 42 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 39  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 22 पुरुष, 17 स्त्री रुग्ण आहेत. त्यातील 11 जण हे अकोला शहरातील, अकोला ग्रामीण येथील पाच, मुर्तिजापूर येथील नऊ व अकोट येथील सहा, तेल्हारा येथील आठ रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

119 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

452 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64802(48946+14960+896) आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 63188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 452 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 270 चाचण्यात सात पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.8) दिवसभरात झालेल्या 270 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बाळापूर येथे दोन, तेल्हारा येथे दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 29  चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर अकोट येथे दोन चाचण्यात एक, मुर्तिजापूर येथे दोन चाचण्यात एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 220 चाचण्यात तीन, हेडगेवार लॅब येथे 13 चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 270 चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ