कोविडःआरटीपीसीआरमध्ये 12 पॉझिटिव्ह, 54 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन एक पॉझिटीव्ह
अकोला दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 146 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून पाच असे एकूण 12 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे
आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64731(48892+14948+891) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 7 व खाजगी 5) 12 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी
1 = एकूण पॉझिटीव्ह 13.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 363861
नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 359761 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3690 नमुने होते. आजपर्यंत एकूण 363861 अहवाल प्राप्त झाले आहेत.
एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 314969 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर 12 पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआरचाचण्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सात जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात चार पुरुष, तीन स्त्री रुग्ण आहेत. त्यातील पाच जण हे
अकोला शहरातील, अकोला ग्रामीण व तेल्हारा
येथील प्रत्येकी एक रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
54 जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
665 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64731(48892+14948+891)
आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 62904 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत 665 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 195 चाचण्यात एक पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात झालेल्या 195 चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात तेल्हारा येथे दोन, मुर्तिजापूर येथे
एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 152, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 36, हेडगेवार
लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोट येथे दोन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 195 चाचण्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा