महिला उद्योजकांना पाठबळ; शासनाचा विशेष उपक्रम: २५ पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

अकोला, दि.१८(जिमाका)-महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्‍यता सोसायटी, मुंबई आणि अमेरिकी दूतावास व अलायन्‍स फॉर इनोव्‍हेशन रिसर्च (ACIR) यांचे संयुक्‍त विद्यमाने महत्‍वाकांक्षी आणि नाविन्‍यपुर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्‍यासाठी  येत्या दि.८ मार्च (जागतिक महिला दिन) पासून हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक महिला उद्योजकांनी www.mahawe.in  या संकेतस्थळावर  जाऊन  शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी पर्यंत नावे नोंदवावीत,असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

            महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्‍यता सोसायटी, मुंबई आणि अमेरिकी दूतावास व अलायन्‍स फॉर इनोव्‍हेशन रिसर्च (ACIR) यांचे संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण ८ मार्च २०२२ या आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होईल. प्रशिक्षणामध्ये आपल्या उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्ट अप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी "पिच" करावी अशा विविध मुद्यांवर माहिती देण्यात येईल, असे कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

राज्य नाविन्यता सोसायटी व स्टार्टअप धोरण

राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरीता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. ४ जानेवारी २०२१ रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, तरी पात्र महिला उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी www.mahawe.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी व दि.२५फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ