कोविडःआरटीपीसीआरमध्ये 17 पॉझिटिव्ह, 165 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन पाच पॉझिटीव्ह

 

अकोला दि.8(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 299 अहवाल प्राप्त झाले. त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून  दोन असे एकूण 17 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64753(48907+14953+893) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 15व खाजगी 2) 17 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी  5 = एकूण पॉझिटीव्ह 22.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 364160  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 360059 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3691 नमुने होते. आजपर्यंत एकूण 364160 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 315253 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 17 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआरचाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 15  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 10 पुरुष, पाच स्त्री रुग्ण आहेत. त्यातील आठ जण हे अकोला शहरातील, मुर्तिजापूर येथील पाच व अकोट येथील दोन रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

165 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

522 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 64753(48907+14953+893) आहे. त्यात 1162 मृत झाले आहेत. तर 63069 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 522 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 263 चाचण्यात पाच पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 263 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात  अकोला येथे एक, अकोट येथे 25, पातूर येथे एक, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 193, जिल्हा आरोग्य कर्मचारी दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 23  चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तर तेल्हारा येथे तीन चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे 10 चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 263 चाचण्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम