जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम;आकाशवाणी अकोला केंद्रावर आजपासून विशेष कार्यक्रम ‘प्रगतीची पाऊले’ द्वारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनांची माहिती

 अकोला,दि.२८(जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना या अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रावरुन मंगळवार दि.१ मार्च पासून ‘प्रगतीची पाऊले’ हा विशेष कार्यक्रम सुरु होत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी सहकार्य केले आहे. दि. १४ मार्च पर्यंत या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार दररोज सकाळी साडेआठ आणि रात्री नऊ वाजता प्रसारित होईल,असे आकाशवाणी अकोला केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ