क्रीडा प्रबोधिनीमार्फत खेळाडूंचे ‘टॅलेंट सर्च’ ला मुदतवाढ
अकोला,दि.28 (जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने संचालनालयाअंतर्गत ११ क्रीडा प्रबोधिनींची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य प्राप्त खेळाडूची ‘टॅलेंट सर्च’ मोहिम राबविली जात आहे. आता या मोहीमेला मंगळवार दि.15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा
राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार
आहे. राज्यातील एकूण नऊ क्रीडा प्रबोधिनिमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व
कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्या
वतीने भरती प्रक्रीया सुरु करणार आहे. यासाठी विभागस्तरावर चाचण्यांचे
आयोजन करून खेळाडूंची राज्यस्तर चाचणीकरीता निवड केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी,
ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल
टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक या खेळांचा समावेश आहे.
ज्या खेळाडूंचे वय १९ वर्षाच्या आत आहे अशा खेळाडूंची
या निवासी प्रशिक्षण शिबीरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना
क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी तंत्रशुध्द प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत
क्रीडा सुविधा शासनाच्या वतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक कुस्तीचे
लक्ष्मीशंकर यादव व राज्य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सींगचे सतिशचंद्र भट यांचेशी
संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
००००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा