358 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 174 डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.2(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 358 अहवाल प्राप्त झाले. त्यातील
335 अहवाल निगेटीव्ह तर 23 अहवाल पॉझिटीव्ह आले.
तसेच आज दोन मयत झाले.
त्याच
प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे
आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7572(6181+1236+155) झाली आहे. आज दिवसभरात 174 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39380 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38399, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 773 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 38799 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32618
तर पॉझिटीव्ह अहवाल 7572(6181+1236+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 23 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व आठ
पुरुष आहे. त्यातील जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जण, संतोष नगर येथील दोन तर उर्वरित कौलखेड, मलकापूर,
लक्ष्मी नगर, भागवत वाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव
येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी आठ जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुष आहे. त्यातील राधकीसन प्लॉट येथील दोन
जण तर उर्वरित कौलखेड, जानोरी, शिवनगर,
अंबिका नगर, खडकी बार्शीटाकली व नवीन बसस्टँड
जवळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल
रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला होता. कृपया नोंद घ्यावी.
दोन मयत
दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गितानगर, अकोला येथील 72 वर्षीय पुरुष असून तो दि. 23 सप्टेंबर रोजी दाखल झाला
होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर तिवसा बार्शीटाकली येथील 62 वर्षीय महिला असून ती 19 सप्टेंबर
रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
174
जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून
24 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 15 जण,
उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण,आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, अवघते हॉस्पीटल
मुर्तिजापूर येथून तीन जण, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक
जण, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल
रेजीन्सी येथून नऊ जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून सहा जण, तसेच काल अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक
येथून एक जण व हॉटेल स्कॉयलार्क येथून पाच जण, तर
होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 100 जणांना, अशा
एकूण 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आले
आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात
आली आहे.
1122 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा