184 अहवाल प्राप्त; 26 पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज

 


अकोला,दि.24 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 184 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 158 अहवाल निगेटीव्ह तर 26 अहवाल पॉझिटीव्ह आले.

 त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8240(6649+1414+177) झाली आहे. आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42274  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41180 फेरतपासणीचे 216 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 878  नमुने होते. आजपर्यंत एकूण 42191 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35542 तर पॉझिटीव्ह अहवाल 8240(6649+1414+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 26 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 26 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील तीन जण, रुख्मिणी नगर येथील दोन जण,  उर्वरीत बाळापूर, अकोट फाईल, लाडेगाव, मोठी उमरी, रेल्वे स्टेशन, रामदास पेठ, आर एस हॉस्टेल  रेल्वे स्टेशन, गणेश नगर, आश्रय नगर, केळकर हॉस्पिटल, सुंदर नगर व शास्त्री नगर  येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील काळे प्लॉट जठारपेठ येथील दोन जण, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, जवाहर नगर, कौलखेड, जीएमसी क्वॉटर, तेल्हारा, साखरवीरा व रणपीसे नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 11  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.  

15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  10 जण, ओझोन हॉस्पिटल येथून तीन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक जण व हॉटेल रिजेंसी येथून एक जणांना, अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

496 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8240(6649+1414+177) आहे. त्यातील 270 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7474 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 496 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ