अकोला,दि. 8
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 165
चाचण्या झाल्या त्यात 12
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण येथे
चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 12 चाचण्या
झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे
तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर येथे
एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह
आला नाही, तेल्हारा येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 47 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
78 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे
अहवाल पॉझिटिव्ह आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, असे दिवसभरात
165 चाचण्यांमध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. तर आजपर्यंत 18651 चाचण्या झाल्या त्यात 1343 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा