तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन
अकोला,दि.7 (जिमाका)- मोटार वाहन निरिक्षक यांच्या मार्फत
जिल्ह्यातील तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन
चालक व अनुज्ञप्ती याकरीता शिबिराचे आयोजन सप्टेंबर ते डिसेंबर या
कालावधीमध्ये होणार आहे. या नियोजीत शिबीर ऑक्टोंबर महिण्यात बाळापूर येथे दि. 5 व 20 रोजी, पातूर येथे दि. 9 व 23 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 7 व 22 रोजी,
अकोट येथे दि. 12 व 26 रोजी,
तेल्हारा येथे दि. 19 व 28 रोजी,
तर बार्शिटाकळी येथे 14 व 29 रोजी होईल.
नोव्हेंबर महिण्यात बाळापूर येथे
दि. 6 व 20 रोजी,
पातूर येथे 10 व 24 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 11 व 23 रोजी,
अकोट येथे दि. 17 व 26 रोजी, तेल्हारा येथे दि. 5 व 19 रोजी,
बार्शीटाकळी येथे 12 व 27 रोजी होईल.
तर डिसेंबर महिण्यात बाळापूर येथे
दि. 4 व 18 रोजी,
पातुर येथे 7 व 21 रोजी,
मुर्तिजापूर येथे दि. 9 व 23 रोजी,
अकोट येथे दि. 15 व 28 रोजी,
तेल्हारा येथे दि. 8 व 24 रोजी,
तर बार्शिटाकळी येथे 10 व 31 रोजी होईल. अर्जदारांनी वरिल तारखेस आवश्यकते
प्रमाणे parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन
sarathi.nic.in या पोर्टलवर आपले कामाकरिता ऑनलाईन अपॉयमेन्ट घेणे आवश्यक
आहे. अपॉयमेन्ट असणाऱ्याच अर्जदारांची अर्ज स्विकारण्यात येतील,
असे प्रादेशिक परिवहन
विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा