190 अहवाल प्राप्त; 51 पॉझिटीव्ह, आठ डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.17(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 190 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 139 अहवाल निगेटीव्ह तर 51 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत आहे.   

त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जण व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8037(6499+1374+164) झाली आहे. आज दिवसभरात आठ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 41420 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  40361 फेरतपासणीचे 212 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 847 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41211 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34712 तर पॉझिटीव्ह अहवाल  8037(6499+1374+164) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 51 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 51 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 51 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 20 महिला व 31 पुरुष आहेत. त्यातील वारखेड बार्शीटाकळी येथील आठ जण,  मूर्तिजापूर, मलकापूर व गूळगोळे प्लॉट येथील प्रत्येकी पाच जण, जीएमसी येथील तीन जण, तेल्हारा, बाळापूर, जिएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित समर्थ नगर, हिवरखेड, देशमुख फाईल, खडकी, पातूर, आदर्श कॉलनी, प्रतापनगर, संतोष नगर, रतनलाल प्लॉट, विद्युत कॉलनी, मोठी उमरी, व्यकेटेश नगर, रमेश नगर, शिवाजी नगर, डाबकी रोड, खदान व लेडी हार्डिंग येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये  12 जणांचा व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

आठ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  पाच जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण व हॉटेल रिजेंसी येथून एक जणांना, अशा एकूण आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एक जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण व्हीएचबी कॉलनी, मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून तो दि. १६ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

465 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  8037(6499+1374+164) आहे. त्यातील 264 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7308 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 465 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम