व्यायामशाळा व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 


        अकोला, दि.26(जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत  महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार रविवार दि.25 पासून  व्यायामशाळा (Gymnasiums) व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबतचे आदेश प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्‍या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.

जिम्नॅशियम व इनडोअर खेळ याठिकाणी गर्दी टाळण्‍यासाठी व सोशल डिस्‍टंनसिंगच्‍या नियमांचे पालन करण्‍यासाठी सरावाकरिता आवश्‍यक तेवढयाच मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्‍यात यावा व सर्वांनी मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील, वय वर्ष १० वर्षाच्‍या आतील मुलांना तसेच ६५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेशास निषेध  राहील, सरावास येणाऱ्या खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करण्‍यात यावी, इनडोअर हॉलमध्‍ये सराव करतांना दारे, खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्‍यात यावा, मैदाना तसेच  इनडोअर हॉल येथे वारंवार निर्जंतूकीकरण करण्‍यात यावे, खेळासाठी वापरण्‍यात येणारे क्रीडा साहित्‍य वापरण्‍यापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील, मैदानाच्‍या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावरइनडोअर हॉल येथे ठिकठिकाणी हॅण्‍ड सॅनिटायझर उपलब्‍ध करणे बंधनकारक आहे, सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, कोविड -19 च्या संदर्भात लक्षणे नसल्‍यास खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्‍यास प्रवेश देण्‍यात येवू नये, कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. हे आदेश जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ