रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 142 चाचण्या, सात पॉझिटिव्ह
अकोला,दि. 22(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 142 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व पातूर येथे
चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे
पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे चार
चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शिटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे 32 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर
येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या
झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 28 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, 41 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 17 चाचण्या
झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे पाच
चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 142 चाचण्यांमध्ये सात जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 20638 चाचण्या झाल्या त्यात 1448 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा