रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 171 चाचण्या, दोन पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 18(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 171 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही.  बाळापूर येथे 25 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हेडगेवार लॅब  येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 82 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर 64 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 171 चाचण्यांमध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 20103 चाचण्या झाल्या त्यात 1422 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ