महिला शेतकरी दिनानिमित्त कळंबेश्वर येथे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 



अकोला,दि.15(जिमाका)- महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं यंदाच्या वर्षापासून 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून घोषित केला आहे.या दिनाचं औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने मौजे कळंबेश्वर येथे प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. कांतप्पा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी दिनकर प्रधान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील सौ.भाग्यश्री पाटील, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, मंकृअ प्रदिप राऊत,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भाग्यश्री पाटील यांनी शेतीमध्ये महिलाचा सर्वाधिक वाटा असून अनेक महिला शेतीपूरक व्यवसाय करून नावीन्यपूर्ण शेती करीत असल्याचे उदाहरण देऊन गटाच्या माध्यमातून चांगलाप्रकारे प्रगती करत आहेत त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या शेतीपूरक व्यवसाय बाबत तांत्रिक माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी आत्मा यंत्रणा मार्फत नोंदणी झालेल्या शेतकरी महिला गटाच्या अध्यक्षा  यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.मंकृअ प्रदिप राऊत यांनी महिला गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी माहिती दिली. त्यानंतर विजय शेगोकार यांनी महिला गटाच्या वतीने करण्यात येणाऱ्या शेतीपुरक व्यवसाय बाबत माहिती दिली. यावेळी उपस्थिती म्हणून कृषी पर्यवेक्षक रामदास राखोंडे.कृषी सहाय्यक पी.एस.वानखडे या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ.ए.पी.पेटे कृषी मित्र गुलाबराव डोंगरे यांनी पुढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ