अकोला,दि. 20(जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 128 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, पातूर व
तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सहा चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, बार्शिटाकळी
येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या
झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 23 चाचण्या
झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 69 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे
17 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
आला, तर हेडगेवार लॅब येथे एकाची
चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 128 चाचण्यांमध्ये
तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 20380 चाचण्या झाल्या त्यात 1435 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा