172 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 190 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.10(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 172 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 152 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7792(6327+1310+155) झाली आहे. आज दिवसभरात 190 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40248 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  39228 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 812 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40250 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33923  तर पॉझिटीव्ह अहवाल  7792(6327+1310+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 20 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात सात जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व 12 पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर व टॉवर चौक येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित सिंधी कॅम्प, आलेगाव ता. पातूर, जठारपेठ, वर्धमान नगर, खंडाळा बाळापूर, बोरगाव मंजू, रवी नगर, आरटीओ ऑफिस जवळ, पिंपळखुटा, वाशिम बायपास, खडकी व हनुमान वस्ती येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक व अनसुया नगर शिवर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 12  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

190 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 13 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण, युनिक हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन जण, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, तर हॉटेल स्कायलार्क येथील नऊ जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 145 जणांना, अशा एकूण 190 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण देवीकर आखाडा, जठारपेठ येथील 55 वर्षीय  महिला असून ती दि. 9 ऑक्टोम्बर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

568 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  7792(6327+1310+155) आहे. त्यातील 254 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6970 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 568 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ