राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

अकोला,दि.(जिमाका)-राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सुताचा माळ अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिवादन केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना