84 अहवाल प्राप्त; नऊ पॉझिटीव्ह, 38 डिस्चार्ज, दोन मयत

 


अकोला,दि.31 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 84 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 75 अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दोघांचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8396(6770+1449+177) झाली आहे. आज दिवसभरात 38 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 43120  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41982 फेरतपासणीचे 226 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 912 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42975 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36205 तर पॉझिटीव्ह अहवाल 8396(6770+1449+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज नऊ पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, मुर्तिजापूर, केशव नगर, वरुळ जऊळका ता.अकोट, मराठा नगर, शासकीय वसाहत व वरुड बु.  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष असून ते बार्शीटाकळी व बाबुळगाव ता.पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

38 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 14 जणांना,  हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून एक जण, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 18 जणांना, अशा एकूण 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वरुळ जऊळका ता. अकोट येथील 27 वर्षीय महिला असून ती दि. 29 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर 69  वर्षीय पुरुष असून तो दि. 28 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

213 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8396(6770+1449+177) आहे. त्यातील 281 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7902 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 213 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ