149 अहवाल प्राप्त; सात पॉझिटीव्ह, 85 डिस्चार्ज, चार मयत

अकोला,दि.9(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 149 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 142 अहवाल निगेटीव्ह तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7760(6307+1298+155) झाली आहे. आज दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40141 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  39128 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 805 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40078 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33771 तर पॉझिटीव्ह अहवाल  7760(6307+1298+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज सात पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात सात जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉटर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 12  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

85 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 24 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून पाच जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, अवघाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा 50 जणांना अशा एकूण 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचा  मृत्यू झाला.  त्यात निंभोरा, अकोला येथील 56 वर्षीय पुरुष  असून ते 7 ऑक्टोंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झालाफिरदोस कॉलनी  येथील 68 वर्षीय पुरुष  असून ते 18 सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तेल्हारा येथील 35 वर्षीय पुरुष  असून ते 23 सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर वाडेगाव, ता. बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष  असून ते 29 सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

727 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या  7760(6307+1298+155) आहे. त्यातील 253 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6780 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 727 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ