संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-2020 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (दि.27) ऑनलाईन उद्घाटन

 


अकोला,दि.26(जिमाका)-  येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ‘संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती’ बैठक 2020 चे उद्घाटन मंगळवार दि.27  रोजी दुपारी 12 वा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते  ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

 ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा प्रतिकुलपती  कृषी विद्यापीठे  ना. दादाजी भुसे  हे राहणार असून  केंद्रीय शिक्षण, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री  ना. संदिपान भुमरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, सहकार, कृषी व मराठी भाषा राज्यमंत्री ना. विश्वजीत कदमफलोत्पादन, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री ना. आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजीत माने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  चे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरु डॉ. ए. एस. ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. एस डी सावंत यांचाही सहभाग राहणार आहेत.

या राज्यस्तरीय बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम भाले हे असून बैठकीच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे  यांचेसह सर्व संचालक, कुलसचिव आणि बैठकीचे यशस्वितेसाठी गठित विविध समिती अध्यक्ष, सहअध्यक्ष, सचिव तथा सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

पाच दिवस चालणाऱ्या कृषीच्या या महाकुंभात राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पिक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा व सुधारणांसह प्रसारित करण्यात येते. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण 208 शिफारसी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत यामध्ये 16 पिक वाण, 12 यंत्रे व अवजारे तर 180 पिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. तथापि  कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाइन पद्धतीने ही बैठक संपन्न होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ