अकोला,दि. 9
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 113
चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आले. अशी
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण,
पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट
येथे 18 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे चार
चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,
मुर्तिजापूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या
नाही, अकोला आयएमए येथे 38 चाचण्या झाल्या
त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 39 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 113 चाचण्यांमध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 18764 चाचण्या
झाल्या त्यात 1354 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा