अनुसुचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
अकोला,दि. 5 (जिमाका)- महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसुचित जमातीच्या 10 विद्यार्थ्याना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात खालील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकडुन शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास
प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा
विहित नुमूना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात
पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या अकोला, वाशिम , बुलढाणा जिल्हयातील रहिवासी
असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास
प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत
आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक
आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात शनिवार दिनांक 10 आक्टोबर 2020 पर्यंत सादर करावा. या नंतर
सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
राज्यातील आदिवासी
विदयार्थांना विदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी अनुसुचित जमातीच्या
एकुण 10 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी / अभ्यासक्रमासाठी
शिष्यवृत्ती देण्यात येईल. तथापी, 10 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले तर विद्यार्थ्यांना त्यांनी
इयत्ता 12 वी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणा आधारे प्राधान्य देण्यात येईल.
|
अ.क्र. |
अभ्यासक्रमाचे
नाव |
स्तर |
पदवी |
पदव्युत्तर |
एकुण
संख्या |
|
1 |
एम.बी.ए. |
पदव्युत्तर |
0 |
2 |
2 |
|
2 |
वैद्यकीय अभ्यासक्रम |
पदवी
/पदव्युत्तर |
1 |
1 |
2 |
|
3 |
बी.टेक
(इंजिनिअरीग) |
पदवी
/पदव्युत्तर |
1 |
1 |
2 |
|
4 |
विज्ञान |
पदवी
/पदव्युत्तर |
0 |
1 |
1 |
|
5 |
कृषी |
पदवी
/पदव्युत्तर |
0 |
1 |
1 |
|
6 |
इतर विषयाचे
अभ्यासक्रम |
पदवी
/पदव्युत्तर |
0 |
2 |
2 |
|
|
एकुण |
|
2 |
8 |
10 |
सदर शिष्यवृत्ती वर
नमुद केलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यासमोर नमुद केलेल्या
संख्येच्या प्रमाणात मंजुर करण्यात येईल. शिष्यवृत्ती साठी वरील प्रमाणे संख्या
निश्चित केली असली तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विदयार्थांना प्राधान्य देण्यात येईल. तथापी असे उमेदवार
ज्या वेळी उपलब्ध होणार नाहीत त्यावेळी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची निवड
करण्यात येईल. त्याचप्रमाणे वर नमुद केल्या प्रमाणे शिष्यवृत्तीस निश्चित केलेली
संख्या/ क्षमता एका अभ्यासक्रमाकडुन दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी वापरली जाईल.
उमेदवाराची निवड
करतांना भुमीहीन आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच
आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यास या शिष्यवृत्ती साठी प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील
रहिवासी असल्यासंबधी अधिवास प्रमाणपत्र ( नॅशनॅलीटी व डोमॉसीयल सर्टिफिकेट) सादर
करणे आवश्यक आहे. विद्यार्थी महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीचा असावा. त्याबाबत
सक्षम प्राधीकाऱ्याकडुन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्याने अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.या शिष्यवृत्ती
साठी विद्यार्थ्याचे वय दिनांक 01 जुन 2020 रोजी जास्तीत जास्त 35 वर्षापर्यत
असावे. तथापी नौकरी करीत असल्यास विद्यार्थ्याच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा ही 40
वर्षापर्यत राहिल. परंतु नौकरीत नसल्यास विद्यार्थ्यास निवडीची वेळी प्राधान्य
देण्यात येईल. विद्यार्थ्यास परदेशातील मान्यताप्राप्त विदयापीठात प्रथम वर्षाकरीता
प्रवेश मिळालेला असावा.
शिष्यवृत्तीसाठी
पात्र ठरनाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा जास्तीत
जास्त रुपये 6,00,000/- पर्यत राहिल.
त्यासंबधी सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्याने
कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे याची माहिती आयुक्तालयास
दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही.सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील
केवळ एकाच व्यक्तीस ( मुलगा/मुलगी) आणि एकाच अभ्यासक्रमास अनुज्ञेय राहिल. शिष्यवृत्ती
धारक विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, अभ्यासक्रंमासाठी शासना
मार्फत खर्च करण्यातआलेली संपुर्ण रक्कम त्यांचे कडुन वसूल करण्यात येईल. तसेच सदर
अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान 5 वर्ष भारतात सेवा करणे
बंधनकारक राहिल या अटी मान्य असल्यासंबधी विद्यार्थ्याने लेखी हमीपत्र (बॉण्ड) दोन
जामीनदारासह सादर करावे लागेल.
परदेशात अभ्यासक्रमासाठी
एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही अथवा शिष्यवृत्तीस मंजुरी घेतेवेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे त्यात बदल
करता येणार नाही. विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात
स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे.अभ्यासक्रम संपल्यानंतर संबधीत विद्यार्थ्याने त्वरीत
भारतात येवुन त्याचे अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास
नाशिक यांना सादर करणे आवश्यक राहील.
याशिवाय सध्या करीत असलेल्या व्यवसायाची
माहिती द्यावी. नौकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा
अर्ज त्याच्या नियोक्त या मार्फत सादर करणे बंधनकारक राहिल. परदेशात ज्या विद्यापिठात
विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे त्या विद्यापिठास
व संस्थेस ऑनलाईन प्रणाली नुसार डायरेक्ट खात्यावर टयुशन फि जमा करण्यात येईल.
तथापि, विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता त्याचे खात्यावर जमा करण्यात येईल.
शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास,
परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाचा कालावधी पलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार
नाही. संबधीत विद्यार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक , विद्यापिठ फी व निवास फी अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत
दिल्यानंतरच पुढिल वर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजुर करतील. अभ्यासक्रमाचा
कालावधी संपल्यावर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार आयुक्तालया मार्फत
केला जाणार नाही अथवा त्यासाठी कोणताही जादा निधी मंजुर केला जाणार नाही. परदेशातील
ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड झालेली आहे, त्या देशाचे
पारपत्र (व्हिजा) प्राप्त करण्याची
जबाबदारी संबधीत विद्यार्थ्याची राहिल. यासाठी राज्य अथवा केंद्रशासनाचे
अर्थसहाय्य मंजुर होणार नाही.ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थी प्रवेश घेणार आहे.
त्याच अभ्यासक्रमासाठी फी अनुज्ञेय राहिल, इतर कोणत्याही अनुषंगीक अभ्यासक्रमासाठी
प्रवेश व फी अनुज्ञेय राहणार नाही. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने अर्जासोबत चुकिची माहिती अथवा खोटे कागदपत्र
सादर केल्याचे आढळून आल्यास अशा विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती पोटी शासनाने केलेला
संपुर्ण खर्च शेकडा 15 टक्के व्याजासह
वसूल करण्यात येईल. तसेच सदर विद्यार्थ्याचे नाव काळया यादीत टाकण्यात येईल.
परदेशी विद्यापिठामध्ये
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE(Graduate Record Examination) तसेच TOFEL ( Test of English as a Foreign Language) / IELTS (International
English Language Testing System) या प्रवेश परिक्षा घेतल्या जातात.
सदर GRE च्या आधारावर प्रवेश घेणा-या व TOFEL/ IELTS उत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल. ज्या परदेशी विद्यापिठाचे
जागतिक रँकिंग (Latest QS World
Raking ) 300 पर्यंत आहे अशाच विद्यापिठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी
या योजनेसाठी पात्र राहतील मात्र निवड
मेरिट नुसारच होईल. विद्यार्थ्यांस शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता (निवास व भोजन) शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ
देण्यात येतील. विमानप्रवास, विजा फी , स्थानिक प्रवास भत्ता, विमा, संगणक, लॅपटॉप
व आयपॅड व इतर सुविधांचा खर्च विद्यार्थ्यास स्वखर्चाने करावा लागेल. नोकरीत
असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीस सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्त्या मार्फत
सादर करणे बंधनकारक राहिल.
परदेशातील ज्या
अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हिजा) व पासपोर्ट प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विद्यार्थ्याची राहिल. यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही. परदेशातील विद्यापिठामध्ये प्रवेश
मिळाल्याबाबतचे त्या विद्यापिठाचे पत्र व संबधित विद्यापिठाचे प्रॉस्पेक्टस ची प्रत अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक
शुल्कासह येणा-या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र परदेशात ज्या अभ्यासक्रमास प्रवेश
घेतला आहे त्या अभ्यासक्रमाशी संबधीत असलेल्या शाखेतील /विभागातील दोन विदयेकनिष्ठ
/ फॅकल्टी यांचे शिफारस पत्र (Reference).
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित
नमुन्यातील आवेदन पत्र (अर्ज) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य,
नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती, नाशिक, नागपुर, ठाणे यांचे कार्यालयात
तसेच सबंधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालयात
कार्यालयीत वेळेत विनामुल्य उपलब्ध आहे.
00000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा