अकोला,दि. 1
(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 184
चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आले, अशी
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व
पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे
15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे दोघांचे चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला
आयएमए येथे 50 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 69 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या
चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 33 चाचण्या झाल्या
त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात
184 चाचण्यांमध्ये 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. तर आजपर्यंत 17625 चाचण्या झाल्या त्यात 1267 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा