259अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 40डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.6(जिमाका)-आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 259अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 230 अहवाल निगेटीव्ह तर29 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.
त्याच
प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या
7678(6254+ 1269+155) झाली आहे. आज दिवसभरात 40 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39925 जणांचे नमुने पाठवण्यात आले
आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38931
फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 786
नमुने होते. आजपर्यंत एकूण 39561 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33307 तर
पॉझिटीव्ह अहवाल 7678(6254+
1269+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 29पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 29जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात चार महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील पाच जण, बाळापूर नाका, प्रसाद नगर व अकोट येथील प्रत्येकी
दोन उर्वरित रामनगर, न्यु तापडीया नगर, शांती नगर, वानखडे नगर, हिंगणा
रोड, सिंधी कॅम्प, देशमुख फैल, जऊळका, मलकापूर व दहिगाव ता. तेल्हारा येथील
प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व सात
पुरुष आहे. त्यातील बाळापूर, केशव नगर, अकोट फाईल, सिंधी कॅम्प, कौलखेड,
अकोट, डाबकी रोड व सिव्हील लाईन येथील
प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
40 जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून
२६ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन जण,
उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण,
आयकॉन हॉस्पिटल येथून तीन जण, अवघते हॉस्पिटल
येथून तीन जण तर कोविड केअर सेंटर
बार्शीटाकली येथून तीन जणांना,अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज
देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोन मयत
दरम्यान
आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात दहिगाव
ता. तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष असून ते 3 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता.
त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच बिर्ला रेल्वे कॉलनी, जठारपेठ
येथील ९८ वर्षीय पुरुष असून तो दि. २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा
उपचार घेतांना मृत्यू झाला.
823
रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा