प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

 

                   

अकोला,दि. 5 (जिमाका)- पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर) या 8 फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये शासन निर्णय दि. 05 जून 2020 व 12 जून 2020 नुसार अटी शर्ती व  अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.कर्जदारशेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बॅंकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरुन बॅंक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-21 या हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिके घेणारे (कुळाने/ भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी)या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरीक्त विमा संरक्षण देण्यात येते त्यासाठी अतिरीक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे.जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा  आहे.केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागु राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. त्यासाठी अधिसुचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय संत्रा व मोसंबीसाठी तीन वर्ष, दाळींब व द्राक्षासाठी दोन वर्ष, आंबा व चिक्कुसाठी पाच वर्ष आहे.

सदर योजना सन 2020-21आंबिया बहार मध्ये 5 जिल्हा समुहांसाठी खालील विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा समुह निहाय विमा कंपनी व त्यांचे जिल्हे खालील प्रमाणे आहेत.

आंबिया बहार सन 2020-21 करीता जिल्हा निहाय सहभागी विमा कंपन्यांचा तपशील.

अहमदनगर, अमरावती,  सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळसातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर या जिल्हयांकरीता एचडीएफसी र्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.पहिला मजला, एचडीएफसी हाऊस, 165-166बॅकबे रिक्लॅमेशन, एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई-400020 ग्राहकसेवाक्र. : 022 - 6234 6234, दूरध्वनीक्र. 022 - 6638 3600-मेल:- shailesh.thakur@hdfcergo.com, shekhar.kapale@hdfcergo.com   ही विमा कंपनी आहे.

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे व हिंगोली या जिल्हयाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड,मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20वा मजला,  दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई - 400023

टोल फ्री क्र. : 1800116515, दूरध्वनीक्र. 022 – 61710912 -मेल- mhwbcis@aicofindia.com ही विमा कंपनी आहे.

रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद या जिल्हयाकरीता बजाज अलायन्झ जनरलइन्शुरन्सकं. लि.बजाज अलायन्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411006टोल फ्री क्र. : 1800 209 5858, दूरध्वनीक्र. 020 - 6602 6666-मेल:- pramod.patil01@bajajallianz.co.in, anupam.shrey@bajajallianz.co.in ही विमा कंपनी आहे. धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार या जिल्हयाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड,मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20वा मजला,  दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई – 400023 टोल फ्री क्र. : 1800116515, दूरध्वनीक्र. 022 – 61710912 -मेल-mhwbcis@aicofindia.com ही विमा कंपनी आहे.

आंबिया बहार सन 2020-21 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.

तपशिल

आंबिया बहार

1

शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे/ विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे / शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक.

द्राक्ष

१५ ऑक्टोबर 2020

मोसंबी

31 ऑक्टोबर 2020

केळी

संत्रा

30 नोव्हेंबर 2020

काजू

आंबा (कोकण)

आंबा इतरजिल्हे

31 डिसेंबर 2020

डाळिंब

स्ट्रॉबेरी

14 ऑक्टोबर 2020

आंबिया बहार सन 2020-21 या वर्षासाठी अधिसूचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके विमा संरक्षण कालावधीखालील प्रमाणे  निर्धारित करण्यात आला असून सदरचे निर्धारीत केलेले हवामान धोके (Trigger)लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होईल.

आंबिया बहारमध्ये फळ पिकनिहाय हवामानधोके व विमा संरक्षण  कालावधी

.क्र.

फळपिके

समाविष्ट धोके

विमा संरक्षण कालावधी

शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रु. प्रति हे.

विमा संरक्षित रक्कम

1

संत्रा

1) अवेळी पाऊस

2) कमी तपामान

3) जास्त तापमान

4) जास्त तापमान

01 डिसेंबर 2020ते  31 डिसेंबर 2020

16 जानेवारी 2021ते 28 फेब्रुवारी 2021

01 मार्च 2021ते 31 मार्च2021

01एप्रिल 2021 ते 31 मे2021

 

4000

80,000

5) गारपीट

01 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021

1333

26,667

2

मोसंबी

1)   अवेळी पाऊस

2)जास्त तापमान

3)  जास्त पाऊस

01 नोव्हेंबर 2020ते 31 डिसेंबर 2020

01 मार्च 2021ते 31 मार्च 2021

15 ऑगस्ट2021 ते 15 सप्टेबर 2021

 

4000

80,000

4) गारपीट

01 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021

1333

26,667

3

डाळिंब

1) जादा तापमान

2) जास्त पाऊस व आर्द्रता

०१ जानेवारी 2021 ते 15 मार्च 2021

01 जुलै 2021 ते  31 जुलै2021

6500

1,30,000

4) गारपीट

01 जानेवारी  2021 ते 30 एप्रिल 2021

2167

43,333

4

काजु

1)  अवेळी पाऊस

2)  कमी तापमान

01 डिसेंबर2020ते 31 मार्च 2021

01 डिसेंबर2020 ते28फेब्रुवारी 2021

5000

1,00,000

3)   गारपीट

01 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021

1667

33,333

5

केळी

1)  कमी तापमान

2)  वेगाचा वारा

3) जादा तापमान

01 नोव्हेंबर2020 ते 28 फेब्रुवारी2021

01 फेब्रुवारी 2021 ते 30 जून 2021

01मार्च 2021ते 31 मे 2021

 

7000

1,40,000

4) गारपीट

01 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021

2333

46,667

6

द्राक्ष

1)  अवेळी पाऊस

2)  दैनंदिन कमी

तापमान

16 ऑक्टोबर2020 ते 31 मार्च 2021

01 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021

16000

3,20,000

3)  गारपीट

01 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021

5333

1,06,667

7

आंबा

(कोकण)

1)  अवेळी पाऊस

2)  कमी तापमान

3) जास्त तापमान

01 डिसेंबर 2020ते15 मे 2021

01 जानेवारी 2021 ते15मार्च2021

01  मार्च2021ते15मे2021

7000

1,40,000

4) गारपीट

01 फेब्रुवारी  2021 ते  31 मे 2021

2333

46,667

आंबा (इतर जिल्हे)

1)  अवेळी पाऊस

2)     कमी तापमान

3)     जास्त तापमान

01 जानेवारी2021ते 31 मे 2021

01 जानेवारी  2021 ते 28 फेब्रुवारी 2021

01 मार्च 2021 ते 31 मार्च 2021

7000

1,40,000

4)  गारपीट

01 फेब्रुवारी 2021 ते 31 मे,2021 

2333

46,667

8

स्ट्रॉबेरी

१)  अवेळी पाऊस व सापेक्ष आर्द्रता

२)     अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान

३)  कमी तापमान

15 ऑक्टोंबर 2020 ते  30 नोव्हेंबर 2020

0१ फेब्रुवारी 2021 ते ३० एप्रिल 2021

 

01 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2021

 

10000

,००,०००

४)  गारपीट

01 जानेवारी  2021 ते 30 एप्रिल 2021

3333

66,667

द्राक्ष या फळपिका करीता योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 15 ऑक्टोबर 2020 तर स्ट्रॉबेरी या फळपिका करीता दि. 14 ऑक्टोबर 2020 अशी आहे. त्या दृष्टीने प्राधान्याने या दोन फळपिकांसाठी नोंदणीकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे व इतर अधिसुचित फळपिकांसाठीही संकेत स्थळ या आठवड्यातच कार्यान्वीत करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बॅंक / वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधुन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात येत आहे.

आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ - www.krishi.maharashtra.gov.inपहावे. तसेच ई - सेवा केंद्र व बॅंक स्तरावरही सदर माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सबंधीत सहभागी विमा  कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना