236 अहवाल प्राप्त; 15 पॉझिटीव्ह, 121 डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.3(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 236 अहवाल प्राप्त झाले. त्यातील
221 अहवाल निगेटीव्ह तर 15 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.
त्याच
प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे
आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7594(6196+1243+155) झाली आहे. आज दिवसभरात 121 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39541 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38559, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 774 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 39035 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32839
तर पॉझिटीव्ह अहवाल 7594(6196+1243+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा
रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 15 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात
15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात तीन महिला व सात
पुरुष आहेत. त्यातील बाळापूर, राजपुतपुरा, अमानपूरा, बापू
नगर, श्रद्धा रेसिडेन्सी कौलखेड रोड, राम
नगर, तेल्हारा, पोही लंगापूर, केशव नगर व सातारगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज
सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाचही जण पुरुष आहे. त्यातील
बाळापूर, जूने शहर, निमखेड नगर कौलखेड,
मलकापूर व बार्शीटाकली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
दोन मयत
दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यातील गोविंदकुंज अपार्टमेन्ट, रामदास पेठ, अकोला येथील 58 वर्षीय पुरुष असून तो
दि. 22 सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर गीता नगर, अकोला येथील 67 वर्षीय पुरुष असून
तो दि. 30 सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
121
जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून
32 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच जण,
आयुर्वेदिक हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल
रिजेन्सी येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथील दोन जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा
कालावधी पूर्ण झालेले 81 जणांना, अशा एकूण 121 जणांना
डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
1021 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या
7594(6196+1243+155) आहे. त्यातील 243 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या
एकूण व्यक्तींची 6330 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1021 पॉझिटीव्ह रुग्ण
उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा