कोविड वार्डात काम करणाऱ्या आंतरवासिता डॉक्टर्सना 10 हजार रुपये जादा मानधन देण्यास पालकमंत्र्यांची मान्यता

 


अकोला, दि.6(जिमाका)-  जिल्ह्याचे पालक मंत्री ना.बच्चू कडू यांनी आज कोविड वार्डात काम करणाऱ्या आंतरवासिता डॉक्टर्सना वाढीव दहा हजार रुपये मानधन देण्यास मान्यता दिली आहे. आंतरवासिता डॉक्टरांनी कोविड वार्डात काम केल्याबद्दल नियमित मानधना व्यतिरिक्त विशेष मानधन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात आज पालकमंत्री ना. कडू यांच्याकडे आंतरवासीता डॉक्टरांच्या या मागणीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुद्दा मांडला होता. त्यावेळी ना.कडू यांनी, मागणी करण्यात आलेल्या 19 हजार रुपयांपैकी दहा हजार रुपये मानधन देण्यास मान्यता दिली असून उर्वरित रकमेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.दिनेश नैताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन