केन्द्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास एक कोटी 25 लक्षाचे उपकरणे

 

   

  अकोला,दि.16 (जिमाका)- केन्द्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सॅमसन्स या कंपनीव्दारे 1 कोटी 25 लक्षाची उपकरणे सिएसआरच्या माध्यमातून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. यासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी यांच्याकक्षात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सदर उपकरणे बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे तसेच या प्रस्तावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता घेण्याबाबत अधिष्ठाता यांना यावेळी निर्देशीत करण्यात आले. या उपकरणामुळे रुग्णांना मोठया प्रमाणात लाभ होणार असून सोनोग्राफीसारख्या सुविधेची सोय होणार आहे.  यामध्ये सॅमसन्स अल्ट्रा साऊंड मशीन, मोबाइल डिजीटल रेडीओग्राफी मशीन, एअर कडींशनर, एलईडी टिव्ही, रेफ्रिजेटर, लेसन प्रिंटर,थर्मल प्रिंटर, युपीएस, स्टॅबेलायझर, ॲण्टी रेडीऐशन किट व एअर प्युरीफायरचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना