‘माझे कूटुंब, माझे जबाबदारी’ अंतर्गंत विविध स्पर्धामध्ये सहभागी होणे काळाजी गरज - मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार


 

अकोला,दि. 20 (जिमाका)- जिल्हा‍ प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ अंतर्गंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उमरी अंगणवाडी केन्द्रामध्ये  आगर, दहिहांडा, आपातापा, भैरद या ग्रामीण भागातील एकूण 22 प्रतिकृती (मॉडेल) सुंदर असे देखावे तयार करण्यात आले आहे. याची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केली. पाहणी दरम्यान महिला व बाल कल्याणचे सभापती मनिषा बोर्डे, उपमुका बालविकास प्रकल्प अधिकारी विलास मरसळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी,  मुख्य अंगणवाडी परिवेक्षीका देवश्री कुलकर्णी, ललीता कात्रे, अंगणवाडी सेविका आदि प्रामुखाने उपस्थित होते.

पाहणी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी कौतुक करुन अभिनंदन केले. अशा प्रकारच्या विविध  स्पर्धेमध्ये सर्वानी सहभाग घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. सदर स्पर्धा ही 30 ऑक्टोंबरपर्यंत आयोजीत करण्यात आली आहे. त्यानंतर येणाऱ्या स्पर्धकाचा विचार केल्या जाणार नाही, यांची नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ