जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्र रद्दी विक्री


अकोला,दि. 29(जिमाका)- जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी वृत्तपत्रे विक्री करावयाचे आहेत. त्यासाठी स्थानिक अधिकृत परवानाधारक रद्दी खरेदीदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक खरेदीदाराकडे वजन मापे विभागाने प्रमाणित केलेला वजनकाटा असणे आवश्यक आहे. तसेच रक्कमेवर नियमानुसार आठ टक्के विक्रीकर आकारण्यात येईल. तरी इच्छुक खरेदीदारांनी  वृत्तपत्र रद्दी खरेदीसाठी दरपत्रके बंद पाकीटात जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर पूर्वी कार्यालयीन वेळेत  पाठवावी. सर्वाधिक दर देणाऱ्या खरेदीदारास रद्दी विक्री करण्यात येईल. रद्दी विक्री प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित करण्याचे अधिकार राखीव आहेत. यांची कृपया नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना