महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे 21 ऑक्टोबर रोजी शिबीराचे आयोजन

 

अकोला,दि.16(जिमाका)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना2019 या राज्य्शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरु असुन सदर योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि 30 सप्टेबर 2019 पर्यत व्याजासह रु. 2 लाखापर्यत थकीत कर्जाची रक्कम संबधीत पात्र  शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फवर्ग करण्यात येते. योजनेअंतर्गत संबधीत बॅकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्याच्या यादया पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अकोला जिल्हयामध्ये 13 ऑक्टोंबर अखेर अकोला येथील 498, मुर्तिजापूर येथील 421, पातुर येथील 284, बाळापूर येथील 673, तेल्हारा येथील 364, बार्शिटाकळी येथील 238, अकोट येथील 434 असे एकूण 2912 पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे.  

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत लाभार्थी यादीतील पात्र लाभार्थी शेतकरी बंधूभगिनीचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. अशा पात्र लाभार्थी करिता अखेरची संधी म्हणुन 21 ऑक्टोंबर रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व अकोला जिल्हयातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण आपले जवळच्या सि.एस.सी. किवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.

आधार प्रमाणीकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उप, सहाययक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी,  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा अग्रेणी प्रंबधक, सैन्ट्रल बॅक ऑफ इंडिया (लिड) बॅक यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ