161 अहवाल प्राप्त; 26 पॉझिटीव्ह, 164 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.28 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 161 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 135 अहवाल निगेटीव्ह तर 26 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दोघांचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8320(6712+1431+177) झाली आहे. आज दिवसभरात 164 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42771  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  41658 फेरतपासणीचे 222 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 891 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42637 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35925 तर पॉझिटीव्ह अहवाल 8320(6712+1431+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 26 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात एक जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 11 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  रामदास पेठ येथील पाच जण, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट व शास्त्री नगर येथील दोन जण,तर उर्वरित गोडबोले प्लॉट, गणेश नगर, मलकापूर, सिव्हिल लाईन, भिरडवाडी, बाळापूर, शिवणी, व्ही.एच.बी. कॉलनीबार्शीटाकली, मोठी उमरी, जीएमसी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज  सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील राजंदा ता. बार्शीटाकळी, गुलजारपूरा व येवला ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

164 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, अकोला ॲक्झीडेंट क्लिनिक येथून दोन जण तर सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक जण तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 148 जणांना, अशा एकूण 164 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात येवला ता. बार्शीटाकळी येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 27 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. नवानगर बाळापूर येथील 78 वर्षीय वर्षीय पुरुष असून तो दि. 26 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

366 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8320(6712+1431+177) आहे. त्यातील 276 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7678 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 366 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ