तुळजापुर शहरात दि.1 नोव्हेंबर पर्यंत न जाण्याचे आवाहन

 


अकोला,दि. 28 (जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथील देवीच्या दर्शनासाठी  येणाऱ्या भाविकांना तुळजापूर शहरात दि. 1 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश देण्यात येणार नसल्याने भाविकांनी तुळजापुर शहरात येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे अध्यक्ष यांनी केले आहे. या कालावधीत अकोला जिल्ह्यातूनही तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असते. तथापि तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नसल्याने येथून जाणाऱ्या भाविकांची हेळसांड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे अपर दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ