201 अहवाल प्राप्त; 22 पॉझिटीव्ह, 44 डिस्चार्ज, दोन मयत
अकोला,दि.7(जिमाका)-आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 201 अहवाल
प्राप्त झाले. त्यातील 179 अहवाल निगेटीव्ह तर 22 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.
त्याच
प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट
मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या
7713(6276+1282+155) झाली आहे. आज दिवसभरात 44 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40007 जणांचे नमुने पाठवण्यात आले
आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39007
फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 792
नमुने होते. आजपर्यंत एकूण 39762 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33486 तर
पॉझिटीव्ह अहवाल 7713(6276+ 1282+155)
आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 22
पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील
मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व
पारध ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित
जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी,
गजानन नगर, गांधीग्राम, वरूर
जाऊळका ता.अकोट, आळेगाव
ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात
दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, मलकापूर,
कौलखेड, सिंदखेड, खडकी व
वाडेगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे
रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
कृपया नोंद घ्यावी.
44 जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 19 जणांना,
कोविड केअर सेंटर, अकोला येथून 12 जण, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, हॉटेल स्कायलार्क येथून 10 जण, तर कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून
एक जणांना, अशा एकूण 44 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोन मयत
दरम्यान
आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात कृषी नगर, सिव्हील लाईन येथील 43 वर्षीय महिला असून तो दि. 24 सप्टेंबर रोजी दाखल
झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर दहीहंडा येथील 65 वर्षीय
पुरुष असून तो दि. 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा
उपचार घेतांना मृत्यू झाला.
812
रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा