जिल्ह्याधिकारी कार्यालयात अभिवादन

 


अकोला,दि.31(जिमाका)- देशाचे पहिले माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी ऋषी  यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज सकाळी  11 वाजेच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ देण्यात आली..

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आले.

यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोलकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ