कोविड-19 : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
अकोला,दि. 6 (जिमाका)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना संसर्गाचा फैलाव आपण रोखू शकतो असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील
नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ना. कडू बोलत हेाते. यावेळी विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरीया, विधान
सभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे
वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील तालुक्यांची
ठिकाणे व ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याबाबत राबविण्यात येत
असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच कोविड-19
संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात
आला. यात प्रामुख्याने गावनिहाय संदिग्ध व जोखीमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करणे.
त्यातील संदिग्ध वाटणाऱ्या लोकांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या करुन घेणे. त्यानंतर
त्याच्यातील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंच्या चाचण्या
कराव्या व आवश्यकतेनुसार उपचारासाठी क्वारंटाईन करणे इत्यादी उपाययोजना कराव्या,
असे निर्देश देण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध
उपचार सुविधा, औषधीसाठा
याबाबतही आढावा घेण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा